व्यंकटेश स्तोत्र मराठी | Vyankatesh Stotra in Marathi

स्वागत आहे मित्रांनो आज आपण व्यंकटेश स्तोत्र मराठी | Vyankatesh Stotra in Marathi पाहणारा आहोत. खूप व्यक्ती व्यंकटेश स्तोत्र मराठी मध्ये शोधात असतात तर या पोस्ट मध्ये तुम्हला Vyankatesh Stotra in Marathi सर्व पाहायला मिळेल.

व्यंकटेश स्तोत्र मराठी | Vyankatesh Stotra in Marathi

||श्री व्यंकटेश स्तोत्र||

श्रीगणेशाय नमः । श्री व्यंकटेशाय नमः ।

ॐ नमो जी हेरंबा ।सकळादि तूं प्रारंभा ।
आठवूनि तुझी स्वरुपशोभा । वंदन भावें करीतसे ॥ १ ॥

नमन माझे हंसवाहिनी । वाग्वरदे विलासिनी ।
ग्रंथ वदावया निरुपणी । भावार्थखाणी जयामाजी ॥ २ ॥

नमन माझे गुरुवर्या । प्रकाशरुपा तूं स्वामिया ।
स्फूर्ति द्यावी ग्रंथ वदावया । जेणें श्रोतया सुख वाटे ॥ ३ ॥

नमन माझे संतसज्जना । आणि योगियां मुनिजनां ।
सकळ श्रोतयां सज्जना । नमन माझे साष्टांगी ॥ ४ ॥

ग्रंथ ऐका प्रार्थनाशतक । महादोषासी दाहक ।
तोषूनियां वैकुंठनायक । मनोरथ पूर्ण करील ॥ ५ ॥

जयजयाजी व्यंकटरमणा । दयासागरा परिपूर्णा ।
परंज्योति प्रकाशगहना । करितों प्रार्थना श्रवण कीजे ॥ ६॥

जननीपरी त्वा पाळिलें । पितयापरी त्वां सांभाळिले ।
सकळ संकटापासूनि रक्षिलें । पूर्ण दिधलें प्रेमसुख ॥ ७ ॥

हें अलोलिक जरी मानावें । तरी जग हें सृजिलें आघवें ।
जनकजनीपण स्वभावें । सहज आलें अंगासी ॥ ८ ॥

दीनानाथा प्रेमासाठी । भक्त रक्षिले संकटी ।
प्रेम दिधलें अपूर्व गोष्टी । भजनासाठी भक्तांच्या ॥ ९ ॥

आतां परिसावी विज्ञापना । कृपाळुवा लक्ष्मीरमणा ।
मज घालोनी गर्भाधाना । अलौकिक रचना दाखविली ॥ १०॥

तुज न जाणतां झालों कष्टी । आतां दृढ तुझे पायीं घातली मिठी ।
कृपाळुवा जगजेठी । अपराध पोटीं घालीं माझें ॥ ११ ॥

व्यंकटेश स्तोत्र मराठी | Vyankatesh Stotra in Marathi

Leave a comment