प्रजासत्ताक दिन भाषण निबंध । 26 January Speech in Marathi

प्रजासत्ताक दिन Republic Day information in Marathi – आपल्या भारत देशात लोकशाही आहे परंतु ती लोकशाही केव्हापासून लागू झाली आहे हे खूप कमी लोक्कांना माहित आहे. आप आपण या पोस्ट मध्ये प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? प्रजासत्ताक दिन केव्हापासून साजरा केला जातो? प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामागील कारण काय आहे? आणि प्रजासत्ताक दिनाबद्दल भाषण निबंध यांच्याविषयी माहिती बघणार आहोत.
 
Republic Day Speech in Marathi
Republic Day Speech in Marathi
 

प्रजासत्ताक दिन भाषण निबंध

जसे की आपल्या सर्वांना माहित आहे आपल्या भारत देशात प्रजासत्ताक दिन हा जानेवारी मध्ये २६ तारखेला साजरा केला जातो. तसे पाहता प्रजासत्ताक दिनाचा संबंध हा भारतातील लोकशाहीशी येतो. भारतामध्ये लोकशाही उदयास येण्यामागचे कारण म्हणजे प्रजासत्ताक दिन होय.
 
भारतामध्ये प्रजासत्ताक दिन हा २६ जानेवारी `१९५० पासून साजरा केला जातो. या मागील कारण म्हणजे आपलं संविधानाही अंलबजावणी हि २६ जानेवारी १९५० रोजी केली गेली होती. त्या दिवसापासून आपल्या देशामध्ये लोकशाही ची सुरुवात झाली. 
 

लोकशाही म्हणजे काय?

तसे पाहत लोकशाहीची व्यख्या खूप सोपी आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोंकांचे लोकांसाठी चालवले जाणारे राज्य म्हणजेच लोकशाही होय. आपल्या देशात लोकशाहीच्या म्हणजेच संविधानाच्या द्वारे लोकांना भरपूर अधिकार देण्यात आले आहे. 
 
आपला देश हा विविधतेने नटलेला देश आहे आपल्या देशात तब्बल ३५ पेक्षा जास्त राज्य आहेत. भारतातील प्रत्येक राज्यात वेगळीक आढळून येते. प्रत्येक राज्याची भाषा, राहणीमान, खाद्यपदार्थ, भौगोलिक रचना तसेच नृत्य प्रकार सुद्धा वेगळे आहेत.

प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती

जसेकी आपणास माहित आहे कि भारतात प्रजासत्ताक दिन हा २६ जानेवारी १९५० पासून साजरा केला जातो परंतु आपल्या देशाला स्वतंत्र १५ ऑगस्ट १९४७ ला मिळाले होतो त्यामुळे १५ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतामध्ये स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा केला जातो.
 
या दिवशी भारताची  राजधानी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते लाल किल्ला येथे ध्वज रोहन केले जाते. यानंतर भारतचे पंतप्रधान देशाला संबोधून भाषण करतात.
 
भारतात प्रत्येक राज्यात, तालुक्यात, जिल्ह्यात आणि गावात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रत्येक शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनाचा एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो.
 
भारतामध्ये सर्व शाळेमध्ये सकाळी प्रभात फेरी काढली जाते. नंतर शाळेच्या आवारात ध्वजारोहण केला जातो. त्यांनतर प्रत्येक शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 
 
प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. त्यादिवशी प्रत्येक व्यक्तीची मन हि उंचावलेली असते. अशाप्रकारे भारतामध्ये विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.
 
Republic Day Speech in Marathi 

Leave a comment