नवरीसाठी मराठी उखाणे । Ukhane Marathi | Marathi Ukhane for Bride

नवरीसाठी मराठी उखाणे, Ukhane Marathi, Marathi Ukhane for Bride, नवरी चे उखाणे – Navriche Ukhane, लग्नातील उखाणे, Marathi ukhane for female, नवनवीन उखाणे, Ukhane Marathi for Marriage, मराठी उखाणे नवरी साठी 2022, Marathi Ukhane Navari , Marathi Ukhane Navari

Marathi Ukhane for Bride

माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,
.. रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.

उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,
…. रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल
…रावांचे नांव घेते तुमच्या साठी स्पेशल..

नवरी चे उखाणे – Navriche Ukhane

सीते सारखे चारित्र्य, रामा सारखे रूप,
….. राव मला मिळाले आहेत ते अनुरूप

मोह नसावा पैश्याचा गर्व नसावा रूपाचा
…… बरोबर संसार करीन सुखाचा.

मंगळसुत्रचा दोन वाट्या संसार माहेर ची खून
______ घेते _____ घराण्याची सून

लग्नातील उखाणे

हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,
…. रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.

मंगळसुत्रचा दोन वाटी सासर आणि माहेर
_____ रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

Marathi ukhane for female

पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,
… रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.

अलंकार अलंकार मंगळसूत्र मुख्य,
…………रावांचा आनंद हेच माझे सौख्य.

पुण्याच्या हायस्कुल मध्ये मुली खेळतात गेम
___ रावांनी मला नाव विचारलं व्हॉट इस युअर नेम.

नवनवीन उखाणे

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
….. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
__ रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.

चांदीच्या वाटीत, सोन्याचा चमचा …
___रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा

Ukhane Marathi for Marriage

पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल,
…रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.

दारी होती तुळस ,तिला घातले होते पाणी ,
आधी होते आई बाबांची तान्ही ,
आता झाले …………ची राणी .

हिमालय पर्वतावर योगी बसले ध्यानाला,
…….रावांचे नाव घ्यायला मानपान कशाला.

मराठी उखाणे नवरी साठी 2022

सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,
….. रावांच्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा

दोन जीवांचे मिलन, जणू शतजन्मांच्या गाठी…
__ रावांचे नाव घेते, तुमच्या आग्रहासाठी

पैठणीवर शोभे, नाजूक मोरांची जोडी…
__मुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी

पूजेच्या ताटात उदबत्तीचा पुडा 
___ रावांच्या नावाने भरला मी हिरवा चुडा.

छान छान उखाणे

दारी होता टेबल, त्यावर होता फोन,
… रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं। कौन?

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
__रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.

परसात अंगण, अंगणात तुळस,
…. नाव घ्यायचा मला नाही आळस.

श्रावण महिन्यात करतात श्रावणी सोमवार 
___ राव आहेत खूपच दिलदार.

Marathi Ukhane Navari

नवे घर ,नवे लोक, नवी नवी नाती
संसार होईल मस्त
…………….. राव असता सोबती.

मनोभावे पूजा केली, लुटले सौभाग्याचे वाण,
…….. साठी मागितले दीर्घायुष्याचे दान,

वाट जीवनाची झाली सुखद आनंदी
……. रावांची साथ मिळाली पदोपदी.

पंक्तीमध्ये पंचपक्वानाचे ताट, ताटात भात,भातावर वरण, वरणावर साजूक तूप, तुपासारखे मिळाले रूप, रूपासारखा आमचा जोडा, ___ रावांचे नाव घेते आतातरी माझी वाट सोडा.

महिलांसाठी मराठी उखाणे -Marathi Ukhane For Female

पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,
….. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.

आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,
…. चं नाव घेते कुंकू लावून.

बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध।
…..रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.

Leave a comment