लहान मुले लवकर बोलण्यासाठी उपाय

नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या आरोग्य मराठी ब्लॉग मध्ये तर आज आपण लहान मुले लवकर बोलण्यासाठी उपाय पाहणार आहोत. Lahan Mul Bolnyasathi Upay

नेहमी पहिले असेल कि आई वडिलांना एक प्रश्न असतो कि आपले मुले लवकर बोलत का नाहीत. परंतु तुम्ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ती म्हणजे लहान बाळाची प्रत्येक सवय हि टप्प्या टप्प्याने मुलामध्ये विकसित होत असते. त्यामुळे मुले लवकर का बोलत नाहीत यावर तुम्ही जास्त चिंता करू नका.

परंतु तुम्ही तुमचे मुलं लवकर बोलण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतात. साधारण पहिले तर लहान मुले हि ९ महिन्यानंतर हळू हळू शब्द काढू लागतात.

Lahan Mul Bolnyasathi Upay
Lahan Mul Bolnyasathi Upay

लहान मुले लवकर बोलण्यासाठी उपाय

आपल्या भाषेमध्ये असे काही शब्द आहेत जे लहान मुले सर्वात अगोदर बोलतात. याचे कारण असे असते कि त्यांना हे शब्द बोलण्यासाठी तोंडाच्या अवयवांची जास्त हालचाल करण्याची गरज नसते.

काही शब्द असे असतात जे लहान मुलांना बोलण्यासाठी अगदी सोपे असतात. जसेकी मामा, बाबा, काका हे शब्द लहान मुले अगदी सहज बोलू शकतात.

म्हणून खूप वेळा पहिले असेल कि बाबा, मामा, काका हे शब्द सारखी पुटपुटत असतात.

काही वेळा पहिले असेल कि आई हा शब्द सुद्धा मुले ९ महिण्यानंतर बोलू लागतात. काही मुले थोडे उशिरा बोलू लागत.

लहान मुले उशिरा बोलू लागतात याचे कारण कर असू शकते?

लहान मुले उशिरा बोलण्यामागे काही पण कारण असू शकते. म्हणजे नैसर्गिक असू शकते, मेडिकल प्रॉब्लेम, किंवा कमी लोकांचा वावर हे पण असू शकते.

परंतु मला असे वाटते कि ज्या लहान मुलांसोबत कुटुंबातील अधिक व्यक्ती खेळतात. त्याच्याबरोबर लहान असल्यापासून गप्पा मारतात. ती लहान बाळे बोण्याचा लवकर प्रयत्न करतात.

लहान मुले लवकर बोलण्यासाठी उपाय काय आहे

मुलांसोबत भरपूर बोलणे – लहान मुलांसोबत जास्तीत जास्त बोलत जा त्यांना उद्देशुन गाणी म्हणा.

छोटे शब्द बोला – त्यांच्यासमोर छोटे छोटे शब्द बोलत जा. उदाहरण तुम्ही काका, मामा, बाबा असे सोपे शब्द त्यांच्यासमोर पुन्हा पुन्हा बोलत चला.

प्रोत्साहन द्या – म्हणजे जर लहान मुले काही करण्याचा प्रयत्न करत असतील तर (जसे कि हात हलवणे, पाय हरवणे, सरकण्याचा प्रयत्न करणे) तुम्ही त्यांच्याकडे पाहून त्यांना ते करण्यासाठी प्रोत्साहन द्या.

खाना खुणा समजून घ्या – खूप वेळा असे दिसते कि लहान मुले आईला खाना खुणा करून काही दाखवण्याचा प्रयत्न करत असतात तर त्या गोष्टींना प्रतिसाद द्या.

टीव्ही मोबाईल पासून दूर ठेवा – जर लहान मुलानं टीव्ही समोर बसवले असेल किंवा त्यांच्या हातात मोबाईल दिला असेल तर तो देऊ नका. यामुळे लहान मुलांचा बोलण्याचा वेग मंदावतो.

तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद

Leave a comment