हिवाळ्यात पायाला पडणाऱ्या भेगा कशा ठीक कराव्या? How to prevent cracked heels in Marathi

How to prevent cracked heels in Marathi?
तुम्हाला पण हिवाळ्याची सुरुवात झाल्यावर पायाला भेगा पडतात का ? तर चिंता नको आज आपण जाणून घेणार आहेत कि हिवाळ्यात पायाला पडणाऱ्या भेगा कशा ठीक कराव्या, त्यासाठी हि पोस्ट पूर्ण वाचा.
 
जर तुमच्या पण पायाला भेगा पडल्या असतील तर तुम्हाला नक्कीच  माहित असेल कि हे किती वेदनादायक असते तर त्याच वेदना कमी करण्यासाठी आणि तुमचे पाय एकदम मऊ होण्यासाठी आज आपण उपाय पाहणार आहोत.
How to prevent cracked heels in Marathi
How to prevent cracked heels in Marathi

हिवाळ्यात पायाला पडणाऱ्या भेगा कशा ठीक कराव्या?

नेहमी झोपताना पाय स्वच्छ धुऊन आणि पायाला हर्बल डेव्हलपर क्रीम लावल्या तर तुमची पायाची त्वचा मऊ होण्यास मदत होते आणि भेगांचा त्रास कमी होतो.

आपल्या घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असणारे लोणी तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या पायाला लावले तर ते सुद्धा तुमच्या पायाच्या भेगा कमी करण्यास मदत करेल आणि तुमच्या वेदना सुद्धा कमी होतील.

हळदी मध्ये कोमट तेल घालून जर तो लेप पायांच्या भेगांमध्ये भरला तर तुमच्या वेदना कमी होऊन पायांना अराम मिळू शकतो.

बोरिक पावडर आणि व्हॅसलिन हे मिश्रण एकत्र करून भेगांमध्ये लावले तर तुमच्या पायाच्या भेगा कमी होऊ शकतात आणि पायांना अराम मिळेल.

झोपण्यापूर्वी पायाला कोमट तेलाने मालिश केली तर तुमच्या पायाच्या भेगा लवकर कमी होऊ शकतात.

चंदन उगाळून पायांच्या भेगा मध्ये लावला तर तुमचे पाय एकदम मऊ होऊ शकतात.

कडुलिंबाच्या पानांचा रस पायाच्या भेगा मध्ये लावला तर तुमचे पाय लवकर बरे होऊ शकतात.

हिवाळ्यामध्ये नेहमी पायांमध्ये बूट घालावे.

अंघोळी वेळी पाय साबुन लावून स्वच्छ धुवावे.

जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या तर तुम्हला हिवाळ्यात पायाला पडणाऱ्या भेगा पासून सहज बचाव करता येईल.

Leave a comment