ऑनलाईन पैसे कसे कमवतात? How to Make Money Online in Marathi

How to Make Money Online in Marathi – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या मराठी ब्लॉग तर आपण पाहणार आहोत कि इंटरनेट च्या मदतीने ऑनलाईन पैसे कसे कमवतात?.

तर आजचा काळ हा डिजिटल युगाचा काळ आहे आणि प्रत्येक जण आजच्या स्थितीला डिजिटल गोष्टींचा वापर करत असतो त्याचबरोबर बरेच लोक याच डिजिटल गोष्टींचा फायदा हा पैसे कमावण्यासाठी करत असतात.

तर याच डिजिटल गोष्टींचा उपयोग करून तुम्ही सुद्धा कशाप्रकारे पैसे कमाऊ शकतात याचीच माहिती आपण या ब्लॉग मध्ये घेणार आहोत.

How to Make Money Online in Marathi ऑनलाईन पैसे कसे कमवतात?

How to Make Money Online in Marathi
How to Make Money Online in Marathi

तसे पाहता ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी खूप गोष्टी आहेत पण आपण त्या गोष्टी पाहणार आहोत ज्यामधून लोकांना खरंच पैसे मिळत आहेत. तर आपण एक एक करून त्या गोष्टी पाहणार आहोत.

१. YouTube

How to Make Money Online in YouTube जवळपास सर्वच जण ज्यांच्याकडे मोबाइल फोन्स असतात त्यांच्याकडे YouTube असतेच. YouTube हा ऑनलाईन इंटरनेट वरचा विडिओ पाहण्यासाठीच प्लॅटफॉर्म आहे.

आपण असे सुद्धा बोलू शकतो YouTube वर जगातील प्रत्येक गोष्ट तुम्हला मिळू शकते. फक्त तुम्हला शोधण्याची गरज आहे.

तुम्ही ज्या विडिओ YouTube वर पाहत त्यामधून ज्या व्यक्तीने ती विडिओ बनवली आहे त्या व्यक्तीला काही प्रमाणात पैसे मिळत असतात.

तुम्हला सुद्धा हा प्रश्न असेल की आता आपण विडिओ पाहतो त्यापासून दुसऱ्या व्यक्तीला कसे पैसे मिळू शकतात?

तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे तुम्ही विडिओ पाहत असताना तुम्हला मध्ये मध्ये ज्या जाहिराती दिसतात त्या मधून त्या विडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला पैसे मिळत असतात.

तुम्ही सुद्धा असेच YouTube यावर विडिओ बनवून पैसे कमवू शकतात. त्यासाठी तुम्हला तुमचा YouTube चॅनेल सुरु करणे गरजेचे असते.

तुमचा YouTube चॅनेल बनवल्यावर तुम्हला ज्या विषयाचे ज्ञान आहे त्याविषयी विडिओ तुम्ही बनवू शकतात आणि तुमच्या चॅनेल वर टाकायला सुरु करा.

जर तुमच्या विडिओ मधून लोकांची मदत होत असेल तर नक्कीच तुम्हाला चांगले Views मिळतील. तुम्ही जर तुमच्या Views म्हणजेच Watch Time आणि Subscriber ने YouTube च्या अटी पूर्ण केल्या तर तुम्हला तुमच्या YouTube चॅनेल मधून पैसे मिळू लागतात.

२. Blogging ब्लॉगिंग

How to Make Money Online in Blogging मित्रांनो दुसरी गोष्ट ज्यामधून तुम्ही मेहनत केली तर खूप चांगली कमाई करू शकतात ती म्हणजे ब्लॉगिंग होय.

आताच्या घडीला खूप लोक असे आहेत त्यांनी आपले कॅरिअर हे ब्लॉगिंग मध्ये बनवले आहेत. त्यांना यामधून खूप चांगले पैसे मिळत सुद्धा आहेत.

आता एक प्रश्न म्हणजे सर्व लोकांना ब्लॉगिंग या शब्दाचा अर्थ माहित नसेल तर म्हणून सांगतो ब्लॉग म्हणजेच इंटरनेट वरची एक वेबसाइट असते.

परंतु वेबसाइट आणि ब्लॉग यामध्ये थोडा फरक असतो तो म्हणजे वेबसाइट हि एकदाच बनवली जाते आणि त्यामध्ये जास्त बदल होत नसतात तर ब्लॉग मध्ये दररोज नवीन माहिती येत असते.

जर तुम्हला सुद्धा एखाद्या विषयांची माहिती चांगल्याप्रकारे असेल तर तुम्ही सुद्धा तुमची ब्लॉग वेबसाइट बनवू शकतात.

ब्लॉग वेबसाइट बनवल्यानंतर जर तुमच्या ब्लॉग वर चांगले वाचक आले तर तुम्ही गूगल ऍडसेन्स या ठिकाणी तुम्ही तुमच्या वेब्सिते वर ऍड दाखवण्यासाठी apply करू शकतात.

तुम्हला जर गूगल ऍडसेन्स चे अनुमती मिळाली तर तुम्ही ऍडसेन्स च्या ऍड जाहिराती तुमच्या ब्लॉग वर लावू शकतात.

गूगल ऍडसेन्स च्या जाहिराती ब्लॉग वर लावल्यानंतर वाचकांनी जर त्या जाहिरातीवर क्लिक केले तर तुम्हला त्याचे पैसे मिळतात.

३. शेअर मार्केट

How to Make Money Online in Share Market शेअर मार्केट ला आपल्याकडे स्टॉक मार्केट असे पण म्हटले जाते. आणि आपल्या लोकांना वाटते कि यामध्ये पैसे गुंतवणे म्हणजे पैसे घालवणे परंतु असे काही नसून यामधून खूप लोक चांगली कामे सुद्धा करत असतात.

नक्कीच जर तुम्हला शेअर मार्केट चे ज्ञान नसेल आणि तुम्ही त्यामध्ये पसे गुंतवत असाल तर त्यामध्ये नक्कीच तुमचे पैसे जाऊ शकतात.

पण जर योग्य ठिकाणी ज्ञान मिळवून जर तुम्ही योग्य त्या शेअर मध्ये गुंतवणूक केली तर त्यामधून तुम्हला खूप चांगला नफा मिळू शकतो.

शेअर मार्केट हे एका दिवसात शिकण्यासारखी गोष्ट नसते त्यासाठी खुप अभ्यास करावा लागतो. मार्केट चे अंदाज बांधता आले पाहिजेत तरच तुम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकतात.

शेअर मार्केट चे ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हला YouTube किंवा ब्लॉग्स ची मदत घेतली पाहिजे जिथे तुम्हला चांगल्याप्रकारे शेअर मार्केट चे ज्ञान मिळू शकते.

तर आशा आहे मित्रांनो तुम्हला ऑनलाईन पैसे कसे कमवतात? How to Make Money Online in Marathi या विषयी सविस्तरपणे माहिती मिळाली असेल. तुम्हला हि माहिती कशी वाटली तुम्ही आम्हला खाली कंमेंट करून नक्की सांगा आणि हा लेख नक्की पुढे पाठवा.

People Also Search

Easy ways to make money online, How to make money online as a teen, How to make money online for free, How to make money online for beginners

Leave a comment