आषाढी एकादशी माहिती । Devshayani Ekadashi 2021। आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

आषाढी एकादशी माहिती , Ashadhi ekadashi Information in Marathi , Devshayani Ekadashi 2021 , आषाढी एकादशीच्या शुभेच्छा , आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा , Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha In Marathi

नमस्कार स्वागत आहे आपले आपल्या आरोग्य मराठी ब्लॉग मध्ये आज आपण आषाढी एकादशी बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तर तुम्ही नक्की हि पोस्ट शेवट्पर्यंत वाचा.

या पोस्ट मध्ये आपल्याला आषाढी एकादशी वर निबंध तसेच आपल्यला आषाढी एकादशी शुभेच्छा सुद्धा तुम्हला इथे मिळतील.

जसे कि आपण खूप भाग्यवान आहोत कि आपल्यला खूप जुना असा संत परंपरेचा इतिहास लाभला आहे आणि आपल्या पिढ्यानपिढ्या आपण हा इतिहास पुढे घेऊन जात आहोत.

या गोष्टींमधून मिळणार आनंद हा गगनात मावेल नाही एवढा मोठा असतो कारण प्रत्येक वारकरी हा दरवर्षी आषाढी वारीचा खूप आतुरतेने वाट पाहत असतो. कारण वारकऱ्याला आषाढी वरील जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन जो आनंद मिळत असतो तो आनंद त्याला इतर कोणत्याही गोष्टी-मधून मिळत नाही.

याच कारणामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा खूप मोठा वारसा आपल्यला लाभला आहे आणि आप तो तसाच जपून ठेवण्याचा आणि पुढे घेऊन जाण्याचा प्रयास केला पाहिजे.

आषाढी एकादशी माहिती – Ashadhi Ekadashi

हि एकादशी हि आषाढ महिन्यात येत असल्या कारणामुळे या एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात. तसे पाहता आषाढ महिन्यात कमीत कमी दोन एकादशी येतात त्यातील एक म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी आणि दुसरी म्हणजे आषाढ वद्य या दोन एकादशी या आषाढ महिन्यात येतात. जर तिथीची वृद्धी झाली किंवा अधिक मास असेल तर या महिन्यात दोनपेक्षा अधिक एकादशी येऊ शकतात.

तिथीची वृद्धी झाल्यास येणाऱ्या एकादशी

  • देवशयनी एकादशी
  • स्मार्ताची एकादशी
  • भागवत एकादशी

अधिक मास असेल तर येणाऱ्या एकादशी

  • अधिक मास मुळे येणाऱ्या दोन्ही एकादशींना कमला एकादशी हेच नाव असते.

देवशयनी एकादशी – आषाढी एकादशी माहिती

आषाढ महिन्यामध्ये शुक्ल/शुद्ध पक्षातील अकरावी तिथी एकादशीला महा एकादशी / प्रथमा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हटले जाते.

या एकादशी नांतर चतुङ्र्कास काळ सुरु होतो. जो पुढे चार महिने असतो आणि कार्तिकी एकादशी ला संपतो.

आषाढी एकादशी हा खूप पवित्र दिवस असतो आणि या दिवशी उपवास केला जातो.

असा समज आहे कि भगवान विष्णू  या दिवशी योगनिद्रेत जातात आणि पुढे कार्तिकी एकादशीला ते योगनिद्रेतून बाहेर येतात.

पंढपूर आणि आषाढी एकादशी यांचे संबंध खूप घनिष्ट आहे कारण या दिवशी पंढपूर मध्ये विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लोकांचा पूर येतो.

लोक विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी महिनाभर पायी वारी करून पंढरपूर मध्ये पोहचलेले असतात आणि विठू माउलीचे दर्शन घेऊन त्यांना जे समाधान मिळते ते सांगण्यापलीकडचे असते.

पंढरपूर मधील मंदिर हे अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बाधणी झाली आहे. या मंदिराचा इतिहास हा खूप जुना असून याचे पुरावे लिखित स्वरूपात सुद्धा अधुळून येतात.

चंद्रभागेच्या वाळवंटापलीकडून दिसणारी विठ्ठल, रखुमाई व पुंडलिक मंदिराची शिखरे हे प्रत्येक भाविकांचे मन मोहून घेतात. आणि आषाढी एकादशी निमित्ताने मंदिरांवर केलीली रोषणाई पाहून तर सर्व वारकऱ्यांचा उत्साह गगनात मावण्या पलीकडचा असतो.

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने|
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर
चालला नामाचा गजर| अवघे गरजे पंढरपूर||
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।।

हेची दान देगा देवा

तुझा विसर न व्हावा

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

हात कटावरी अन पाय विटेवरी

मिटलेले डोळे तरी हास्य मुखावरी

असा तो पांडुरंग युगान युगे उभा गाभारी

नीलवर्ण प्रभा दिसे पसरली सभोवारी

विठूभक्तांना आषाढी एकादशीच्या

हार्दिक शुभेच्छा!

सावळे सुंदर रूप मनोहर ।

राहो निरंतर हृदयी माझे ।।

आणिक काही इच्छा आम्हां नाही चाड ।

तुझे नाम गोड पांडुरंग ।।

Leave a comment