चहा पिण्याचे फायदे आणि तोटे Advantages and Disadvantages of Drinking Tea

Advantages and Disadvantages of Drinking Tea – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आरोग्य मराठी ब्लॉग वर तर आज आपण पाहणार आहोत कि चहा पिण्याचे फायदे आणि तोटे, तसे पाहता आपण दररोज चहा पीत असतो पण आपण कधी विचार केला आहे का चहा पिण्यामुळे आपल्याला त्याचे काय फायदे आहेत किंवा तोटे आहेत.

Advantages and Disadvantages of Drinking Tea
Advantages and Disadvantages of Drinking Tea

चहा पिण्याचे फायदे आणि तोटे

आपल्या भारतीयांचे सर्वात लोकप्रिय पेय म्हणजे चहा खूप लोक दिवसातून किमान दोन वेळा चहा नक्की पितात तर काही लोक त्यापेक्षा अधिक सुद्धा पण जर आपण अधिक चहा घेत असोत तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर नक्कीच होत असतो.

काही सर्वेक्षणातून असे लक्षात येते कि आपल्या भारत देशातील एकूण लोकसंख्येपैकी ६४% लोक हे दररोज चहा पितात तर यावरून आपण पाहू शकतो कि आपली लोक किती चहा पीत असतील.

चहा पिण्याचे फायदे Disadvantages of Drinking Tea

 1. सकाळी अंघोळ केल्यानंतर चहा पिल्यामुळे ताजेतवाने वाटते.
 2. चहा पिल्यामुळे तरतरी आणि उत्साह निर्माण होतो.
 3. काम करताना आळस येत असेल तर एक काप चहा पिल्याने आळस निघून जातो.
 4. गुळाचा चहा हा आरोग्याला उत्तम असतो त्यामुळे गुळाचा चहा पिणे योग्य राहील
 5. गुळाचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे वाचण्यासाठी नक्की भेट द्या.
 6. जर तुमचे डोके दुखत असेल आणि तुम्ही गुळाचा चहा घेतला तर तुमच्या डोक्याला काहीप्रमाणात अराम मिळू शकतो.
 7. चहामध्ये कैफीन असते पण आपण त्याचे योग्य प्रमाणात सेवन केले तर त्याचा त्रास होत नाही.

चहा पिण्याचे तोटे Disadvantages of Drinking Tea

 1. जर तुम्ही अधिक प्रमाणात चहा घेत असाल तर त्यामुळे तुम्हला ऍसिडिटी चा त्रास होऊ शकतो.
 2. अतिप्रमाणात चहा पिल्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.
 3. तुमच्या शरीरातील ब्लड प्रेशर वाढू शकते.
 4. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढू शकते.
 5. जास्त चहा पिल्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते.

Leave a comment