पित्तावर घरगुती उपाय । Acidity Home Remedies in Marathi

पित्तावर घरगुती उपाय Acidity Home Remedies in Marathi – स्वागत आहे आपल्या आरोग्य मराठी ब्लॉग वर तर आज आपण पित्तावर झाल्यावर घरगुती उपाय कोणते आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत.

पित्त हे असा आजार आहे जो घरामध्ये कोणाला ना कोणाला असतोच. हा आजार काही विशिष्ट पदार्थाचे सेवन केल्यावर होताना अधिकतर आढळतात.

परंतु यावर असे काही उपाय आहेत जे आपण घरीच करू शकतो आणि पित्त या आजारापासून दूर राहू शकतो.

Acidity Home Remedies in Marathi
Acidity Home Remedies in Marathi

पित्ताची लक्षणे – Symptoms of Acidity in Marathi

१. अपचन

२. आंबट ढेकर येणे

३. डोके दुखणे

४. छातीत आणि गळ्यामध्ये जळजळणे

५. पोटात गॅस होणे

पित्त होण्याची करणे – Reasons for Acidity in Marathi

१. काही विशिष्ट पदार्थ खाणे

२. दवाखान्यांतील औषधे

३. जास्त प्रमाणात चहा पिणे

पित्तावर घरगुती उपाय – Acidity Home Remedies in Marathi

१. बडीशेप

बडीशेप हे एक अतिशय औषधी पदार्थ आहे ज्याचा उपयोग पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी करण्यात येतो. तुम्ही जेवण केल्यानंतर थोडी बडीशेप खाल्ल्याने नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल.

अधिक माहिती – बडीशेप चे फायदे

२. ओवा

ओवा हा पदार्थ आपल्या घरामध्ये अगदी सहज मिळणार पदार्थ असतो. ओव्याचे सेवन केल्याने सुद्धा पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.

३. कलिंगडाचा रस

कलिंगडाचा रस हा आपल्या शरीरासाठी अगदी चांगला असतो. यामुळे आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. आणि यामुळे आपल्या शरीराला अराम मिळण्यासाठी मदत होते.

४. तुळशीचे पाने

रिकाम्या पोटी सकाळी जर आपण तुळशीचे पाने स्वच्छ करून बारीक चावून खाल्ली तर आपल्यला पित्तापासून दूर राहण्यासाठी मदत होते. बरोबरच तुळस हि अतिशय औषधी वनस्पती असल्यामुळे आयुर्वेदामध्ये याचा खूप प्रमाणात वापर केला जातो.

५. लवंग

जेवण केल्यानंतर लवंग चघळल्या मुले सुद्धा आपल्यला पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Leave a comment