शरीरातील उष्णता (हिट) कमी करण्यासाठी घरगुती उपाय

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आरोग्य मराठी ब्लॉग वर तर आपण पाहणार आहोत की घरगुती उपाय करून शरीरातील उष्णता कशी कमी करायची तर हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा. ushnata kami karnyache upay

शरीरातील उष्णता (हिट) कमी करण्यासाठी घरगुती उपाय

ushnata kami karnyache upay
ushnata kami karnyache upay

भरपूर पाणी पिणे

आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. पाण्यामुळे आपले शरीर थंड राहण्यासाठी तसेच आपण जेवण केलेले पचन होण्यासाठी पाण्याची गरज आसते. आपण भरपूर पाणी पिले पाहिजे पाण्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी मदत होते.

ताक पिणे

आपण पाहिले असेल की उन्हाळ्यामध्ये गर्मीचे प्रमाण अधिक असल्यामुळे डॉक्टर सुध्दा आपल्याला ताक किंवा लस्सी पिण्याचा सल्ला देत असतात. ताक तसेच लस्सी आपल्या शरीराला थंड ठेवतात तसेच आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत करतात.

काकडी खाणे

काकडी हे उत्तम फळ आहे ज्याचा उपयोग शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी केला जातो. बहुतेक वेळा पाहिले असेल की डॉक्टर सुध्दा आपल्या आहारामध्ये काकडी खाण्याचा सल्ला देत असतात.

मनुके खाणे

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मनुके खाणे हा सुध्दा एक चांगला घरगुती उपाय आहे. दररोज १०० ग्रॅम मनुके कोमट पाण्यात भिजवून सकाळी उठल्यानंतर ते पाण्यासकट चाऊन खावे यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल.

जिरे खाणे

जिरे हे अतिशय थंड असतात त्यामुळे रात्री एक ग्लास मध्ये जिरे भिजवत ठेवावे आणि सकाळी उठल्यानंतर पाणी पिण्याने तुमच्या शरीरातील गर्मी कमी होण्यासाठी मदत नक्कीच होईल.

पाणीदार फळे खावीत

दररोज आहारामध्ये पाणीदार फळांचा समावेश करावा. कलिंगड, टरबूज, द्राक्षे तसेच संत्रे यांचा समावेश असावा यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता कमी होईल. ushnata kami karnyache upay

Leave a comment