योगाचे सात फायदे 7 Benefits of Yoga For Health

Benefits of Yoga For Health – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आरोग्य मराठी ब्लॉग वर तर आज आपण पाहणार आहोत योगाचे सात फायदे आणि योग करण्याचा आरोग्यासाठी कसा फायदा होतो याची माहिती या पोस्ट मध्ये घेणार आहोत.

जसे आपण दररोज नित्यनियमाने कमला जातो तसेच आपल्या शरीराला सुद्धा व्यायामाची गरज असते. व्यायाम हा आपल्या शरीराविषयी आजाराचा एक रामबाण उपाय आहे.

व्यायाम केल्याचे फायदे हे आपल्याला उतार वयात म्हणजेच जसे जसे वय वाढत जाते तसे ते फायदे आपल्याला दिसू लागतात.

अगदीच सांगायचे झाले तर आपण पहिले असेल कि आपले आज्जी आजोबा एवढे म्हातारे होऊन सुद्धा आपल्या बरोबरीने ते आजही काम करू शकतात. त्याचे कारण म्हणजे त्यांनी तरुण वयामध्ये व्यायामाची सवय तसेच त्यांनी घेतलेला पोषक आहार.

Benefits of Yoga For Health
Benefits of Yoga For Health

योगाचे सात फायदे Benefits of Yoga For Health

  1. रोगोप्रतिकार शक्तीत वाढ होते – दररोज योगा केल्यामुळे आपल्या शरीराची कार्यप्रणाली मध्ये सुधार होतो तसेच आपल्या रोगप्रतिकार शक्तीत सुद्धा वाढ होते. आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती अधिक असणे खूप गरजेचे असते कारण आपल्याला कोणताही आजार होण्यापूर्वी आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती तो आजार आपल्याला होऊ न देण्यासाठी कार्य करत असते. रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी यासाठी आपला हा लेख नक्की वाचा – रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे घरगुती उपाय करा.
  2. ताणतणावापासून मुक्ती – आज आपण पहिले तर सर्व जण नोकरी करत असतात आणि जर नोकरी करत नसतील तर स्वतःचा व्यवसाय करत असतील. तर नोकरी आणि व्यवसायामध्ये दररोज खूप ताणतणाव असतो धावपळ असते त्यामुळे आयुष्यामध्ये तणावासारखे वातावरण निर्माण होते. अशातच जर तुम्ही दररोज सकाळी योगा करायला सुरुवात केली तर तुम्हला तुमच्या आयुष्यातील ताणतणाव काही प्रमाणात कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
  3. शरीराची लवचिकता वाढते – योगा हा शांतपणे आणि एकांतात राहून व्यायाम करण्याचा प्रकार आहे. या व्यायामाच्या प्रकारामध्ये शरीराची हळुवार पणे हालचाल केली जाते. दररोज तेच योगाचे प्रकार तुम्ही सातत्याने करत असाल तर नक्कीच तुमच्या शरीराची लवचिकता त्यामुळे वाढायला मदत होते.
  4. वजन कमी होते – जर तुम्ही खूप प्रयत्न करून सुद्धा तुमचे वजन कमी करू शकत नसाल तर तुमच्यासाठी योगा हा एक सर्वात उत्तम पर्याय आहे. सूर्यनमस्कार, कपालभाती तसेच प्राणायम या योगाच्या प्रकारामुळे तुमच्या पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला काही आठवड्यांमध्ये तुमच्या वजनामध्ये फरक जाणवू लागेल.
  5. सजगतेत वाढ होते – आपले मन हे खूप चंचल असते ते कधी भूतकाळाचा विचार करत असते तर कधी भविष्यकाळाचा विचार करत असते त्यामुळे आपले मन विचलित होत असते. याच कारणामुळे आपण कधी कधी आपण चुकीचे निर्णय घेत असतो. योग्य ठिकाणी योग्य निर्णय घेण्यासाठी आपले मन शांत राहणे गरजेचे असते. योगा केल्यामुळे आपल्या सजगतेत वाढ होते तसेच आपल्याला आपले योग्य निर्णय घेण्यासाठी मदत होते.
  6. अंतर्ज्ञानात वाढ होते – बरेचदा आपण घाईमध्ये काही निर्णय चुकीचे घेतो त्यामुळे आपल्याला खूप असे नुकसान सुद्धा होऊ शकते. पण जर तुम्ही दररोज योगा करत असाल ध्यानस्त बसत मेडिटेशन करत असाल तर नक्कीच तुमच्या अंतर्ज्ञानात मध्ये वाढ होऊ शकते. तसेच दररोज मेडिटेशन केल्यामुळे तुमची स्मरण शक्ती सुद्धा वाढवता येते.
  7. शारीरिक स्वास्थ्या सुधारते – दररोज योगा मुळे तुमची दिनक्रिया बनते आणि तुम्ही गोष्टी वेळेवर करू लागत असता. त्यामध्ये तुम्ही चांगला पोषक आहार घेत असता तसेच वेळेवर जेवण करत असता. योगामुळे तुम्हला रात्री झोप सुद्धा खूप चांगली लागते आणि याच कारणामुळे तुमचे शारीरिक स्वास्थ्या सुधारते. Benefits of Yoga For Health

Leave a comment