बटाटा वडा पाव । Batata Vada Pav Recipe In marathi

नमस्कार, बटाटा वडा पाव खायला कोणाला आवडतो? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे, परंतु काही लोक बाहेरच खायला नको म्हणतात कारण त्यांना वाटत की ते आजारी होऊ शकतात.
 
त्यासाठी आज आम्ही तुम्हाला बटाटा वडा पाव घरी कसा करायचा हे शिकवणार आहोत चलातर सुरुवात करूया.
 

Batata Vada Pav Recipe In marathi

Batata Vada Pav Recipe In marathi
Batata Vada Pav Recipe In marathi
 
साहित्य 

५ शिजवलेले मोठे बटाटे
५ ते ६ हिरव्या मिरच्या (तुमच्या अंदाजानुसार)
१ टिस्पून चमचा उडीद डाळ
३-४ लसणींची पेस्ट
१ इंच आले पेस्ट
 कढीपत्ता पाने
२ टेस्पून कोथिंबीर

वडे तळण्यासाठी तेल
फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, चीमुठभर मोहोरी, चीमुठभर जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद
चवीनुसार मीठ
वडयाच्या आवरणासाठी
१ कप चणा पिठ, ३/४ ते १ कप पाणी, १/२ टिस्पून हळद, चवीनुसार मीठ


हे पण वाचाDal Tadka Recipe in Marathi
 
कृती 

१. उकडलेले बटाटे सोलून व ते बारीक़ कुसकरुन घेणे. 

२. त्यामधे बारीक़ कपलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार घाला. आल-लसुन व हिरव्या मिरचीची पेस्ट (चवीनुसार)घाला.

३. फोडणीच्या कढ़ाई मधे तेल गरम करण्यासाठी ठेवावे. तेल कड़कड़ीत तापल्यानंतर त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की मग कढीपत्ता , हळद आणि हींग घालून कुसकरलेले बटाटे त्यामधे टाकून फोडणी दया. नंतर सगळे मिश्रण एकजीव करुण घ्या.

४. आता वड्याच्या अंदाजाप्रमाणे त्या मिश्रणाचे ७ ते ८ गोळे बनवा.

५. वड़े बनवण्यासाठी ३ ते ४ कप बेसन घ्या आणि हळद, मीठ (चवीनुसार ) पाणी टाकून एकजीव करा. हे मिश्रण खुप पात्तळ किंवा खुप जड नको. त्या मिश्रणामधून तार चालेल येवढे असावे.  

६. वड़े तळण्यासाठी कढईत तेल गरम करण्यास ठेवा. तेल गरम झाल्यानंतर सरणाचे गोळे बेसन पीठाच्या मिश्रणामधे बुडवून गरम तेलामधे सोडा. वड्यांना गोल्डन ब्राउन रंग येई पर्यंत हळूहळू तळून घ्या.

तुम्ही हा बटाटा वडा पावाच्या मधे घालून खाऊ शकतात 
धन्यवाद 
 

Leave a comment