पोट साफ होण्याचे घरगुती उपाय

पोट साफ होण्याचे घरगुती उपाय – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आरोग्य मराठी ब्लॉग वर तर आज आपण पाहणार आहोत की पोट साफ न होण्याची लक्षणे तसेच पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय काय असू शकतात.

पोट साफ होण्याचे घरगुती उपाय

१. गुलकंद चा उपयोग तुम्ही पोट साफ करण्यासाठी करू शकतात. रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे गुलकंद खाऊन त्यानंतर त्यावर एक ग्लास कोमट दूध पिऊ शकतात. ही क्रिया काही दिवस केल्याने तुमची पचनशक्ती मध्ये सुधारणा होईल आणि तुमचे पोट साफ होण्यास नक्की मदत होईल.

२. इसबगोल सुद्धा तुमचे पोट साफ होण्यासाठी मदत करू शकते. त्यासाठी तुम्हला रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये थोडे इसबगोल घालून ते घ्यायचे आहे. पोट साफ होण्याचे घरगुती उपाय

३. बेकिंग सोडा पोट साफ न होण्यावर एक रामबाण उपाय आहे. तुमचे पोट साफ होत नसेल व पोटात गॅस झाला असेल तर बेकिंग सोडा एक ग्लास पाण्यासोबत घेतल्याने तुम्हला बरे वाटेल.

४. दुपारचं किंवा रात्रीचे जेवण झाल्यावर शतपावली केल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. पचनक्रिया सुधारल्याने पोट साफ होण्याची समस्या दूर होऊ शकते.

५. फायबर असलेले कडधान्य दररोज खाल्ल्याने सुद्धा बिघडलेली पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ होण्यास मदत होते.

६. एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस तसेच एक चमचा आल्याचा रस आणि एक चमचा मध टाकून पिल्याने सुद्धा पोट साफ होण्यास नक्कीच मदत होईल.

७. दररोज एक ग्लास ताक पिल्याने तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते आणि बरोबरच पोट साफ होण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

हे पण वाचा – हळदीचे औषधी गुणधर्म

पोट साफ न होण्याची लक्षणे

  • वारंवार पोटामध्ये गॅस होणे हे सुद्धा पोट साफ न होण्याचे लक्षण आहे.
  • सतत जळजळ आणि ऍसिडिटी चा त्रास होणे.
  • तुमच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येणे हे सुद्धा पोट साफ न होण्याचे कारण असू शकते.
  • जर तुमच्या शरीरातील प्रतिकारक शक्ती कमी झाली असेल तर तुम्हला पोट साफ न होण्याची लक्षणे दिसू शकतात. पोट साफ होण्याचे घरगुती उपाय

पोट साफ होण्यासाठी योगासने

  1. धनुरासन
  2. भुजंगासन
  3. पवानमुक्तासन
  4. मार्जरीसन

अशाप्रकारे योग चा उपयोग करून सुद्धा पोट साफ न होणे या समस्या पासून सुटका मिळू शकते. पोट साफ होण्याचे घरगुती उपाय

Leave a comment