टोपीवाला आणि माकडे मराठी गोष्ट Topiwalyachi Gosht in Marathi

टोपीवाला आणि माकडे (Topiwalyachi Gosht)

Topiwalyachi Gosht in Marathi
Topiwalyachi Gosht in Marathi
Image Credit –  Pebbles Marathi Youtube Channel
एक टोपीवाला होता. तो गावामध्ये राहत असे तो त्याचे कुटुंब टोप्याविकुन मिळवलेल्या पैशांतून चालवत असे. तो जास्त टोप्या विकण्यासाठी दररोज परगावी जात असे. एकदा असेच टोप्या विकण्यासाठी टोपीवाला शेजारील गावामध्ये जात होता. शेजारील गावामध्ये जाण्यासाठी वाटेमध्ये घनदाट जंगल लागत असे. टोपीवाल्याला वाटेमध्ये खूप भूक लागल्यामुळे त्याने एका झाडाखाली थांबण्याचा विचार केला. आपले गाठोडे ठेऊन त्याने आपले जेवण केलं. आणि जेवण केल्यानंतर त्याने झोपून विश्रांती घेतली. 
 
थोडयावेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. आणि तो उठून बघतो तर काय त्याच्या गाठोड्यातील सगळ्या टोप्या गायब. टोपीवाला चकित झाला माझ्या सगळ्या टोप्या कुठे गेल्या. तो इकडे तिकडे पाहू लागला. परंतु त्याला कुठेच टोप्या दिसत नव्हत्या. मग त्याला झाडावरून आवाज आला आणि पाहतो तर काय. सर्व माकडांच्या डोक्यावर टोप्या. 
 
टोपीवाला डोक्याला हात लावून विचार करू लागला टोप्या परत कशा मिळवायच्या? त्यावेळी माकडांनी पण डोक्याला हात लावला. हे पाहून टोपीवाल्याला वाटले कि माकडे मला चिडवण्याचा प्रयत्न करत आहेत. टोपीवाल्याला राग आणि त्याने एक दगड माकडांकडे झाडावर भिरकावला. हे पाहून माकडांनी पण झाडावरील फळे टोपीवाल्याच्या दिशेने फेकेल. हे पाहून टोपीवाला खूप दुःखी झाला आणि डोक्याला हात लावून बसला. 
 
मग टोपीवाल्याच्या मनामध्ये विचार आला  कि मी डोक्याला हात लावला कि माकडे डोक्याला हात लावतायेत, मी दगड मारल्यानंतर ते फळे फेकून मारतायेत. मग मी जर माझी टोपी जमिनीवर फेकली तर सर्व माकडे नक्कीच टोप्या खाली जमिनीवर फेकतील.
 
आणि मग ठरवल्याप्रमाणे टोपीवाल्याने युक्ती केली आणि आपली टोपी जमिनीवर आपटली आणि पाहतो तर काय? सर्व माकडे आपल्या डोक्यावरील टोप्या जमिनीवर फेकू लागले. हे पाहून टोपीवाला खूप खुश झाला. जमिनीवरील सर्व टोप्या गोळा करून टोपीवाला आपल्या वाटेल निघून गेला. 
 

तात्पर्य – शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ 

Leave a comment