पुणे जिल्ह्याची माहिती आणि इतिहास | Pune District Information in Marathi

पुणे तिथे काय उणे ! हि म्हण खूप प्रचलित आहे तुम्हाला पण माहित असेल पण आज आपण ही म्हण ज्या क्षारामुळे प्रचलित आहे अशा शहराची माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो आज आपण पुणे जिल्ह्याची माहिती आणि इतिहास पाहणार आहोत.

पुणे जिल्यात काय महत्वाचे आहे आणि पुण्यामध्ये काळानुसार होत गेलेले बदल याविषयी पण आपण माहित पाहणार आहोत. पुणे या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी का म्हटले जाते याची माहिती पण आपण पाहणार आहोत.

पुणे जिल्ह्याची माहिती आणि इतिहास

पुण्याची ओळख म्हणजे हे शहर मुळा मुठा या नदीच्या किनारी वसलेले आहे आणि हे भारतातील ७ वे आणि महाराष्ट्रातील २ सर्वात मोठे शहर आहे.

या शहराकडे सर्व आहे जे एका शहरामध्ये असायला हवे आहे. म्हणजे यांच्याकडे प्रेमळ माणसे आहे आणि मराठी भाषेवर प्रेम करणारी माणसे आहेत. ज्यांना आपल्या भाषेविषयी खूप आदर आहे.

आपली भाषा हीच आपली ओळख असे म्हणणारे लोक आहेत. आपण एखाद्या पुणेरी माणसाच्या भाषेवरून सुद्धा तो व्यक्ती पुण्याचा आहे हे ओळखू शकतो.

पुणे जिल्ह्याची माहिती

पुणे या जिल्याचा इतिहास दाखवणारी पुरावे आपल्याला २००० हजार पूर्वीचा इतिहास दाखवू शकतात. एवढे ऐतिहासिक महत्व पुणे या जिल्ह्यला लाभले आहे.

आपले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे महाराजांनी आपल्या जीवनातील महत्वाचा काळ याच पुणे जिल्ह्यात व्यतीत केला आहे. छत्रपती शिवाजीराजे महाराजांचा जन्म सुद्धा याच पुणे जिल्यातील जुन्नर मधील शिवनेरी या किल्ल्यावर झाला आहे.

पुणे जिल्ह्यात पुढील प्रमाणे तालुके आहेत

 • जुन्नर
 • आंबेगाव
 • खेड
 • मावळ
 • मुळशी
 • हवेली
 • वेल्हे
 • भोर
 • पुरंदर
 • बारामती
 • इंदापूर
 • दौंड
 • शिरूर
 • पुणे शहर

पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला खूप ऐतिहासिक असे महत्व आहे. प्रत्येक तालुक्याची ओळख करून देणारे ठिकाणे आहेत.

पुण्यातील तालुक्यानुसार पर्यटन स्थळे

तालुक्याचे नाव पर्यटन आणि धार्मिक स्थळे
जुन्नरशिवनेरी (शिवाजी महाराजांचे जन्मस्थान), ओझर
आंबेगावडिंभे धरण
खेड(आळंदी ज्ञानेश्वर समाधी),चास कमान धरण,चाकण भुईकोट किल्ला, भीमाशंकर अभयारण्य, भीमाशंकर
मावळराजमाची, कार्ला लेणी भाजे लेणी, भुशी डॅम,लोणावळा, खंडाळा
मुळशीमुळशी धरण
हवेलीदेहू(संत तुकाराम महाराज मंदिर), कसबा गणपती, सिंहगड किल्ला, खडकवासला धरण, पानशेत धरण, माळशेज घाट, सारस बाग,
वेल्हेराजगड, तोरणा किल्ला,लिंगाणा,मढेघाट
भोरबनेश्वर भाटघर धरण
पुरंदरजेजुरी, नारायणगाव, सासवड, लोहगड, भुलेश्वर
बारामतीमोरगावचा मयूरेश्वर
इंदापूर
दौंडबहादुरगड, मालठण, कुरकुंभ
शिरूरवढू तुळापूर (संभाजी महाराजांची समाधी)
पुणे शहरपर्वती, शनिवारवाडा

पुणे शहर माहिती । Pune City Information In Marathi

आता आपण पाहुया पुणे शहराविषयी माहिती आणि पुण्यामध्ये असणारी ऐतिहासिक तसेच पर्यटन स्थळे कोणते आहेत.

पुणे हे शहर मागच्या काही दशकांमध्ये खूप बदलले आहे परंतु पुण्याची हि संस्कृती बदली नाही त्याचमुळे पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते.

नेहमीच शिक्षणामध्ये पुणे या शहराने आपला झेंडा उंच असा फडकावत ठेवलेला आहे. पुण्यामध्ये अनेक असे जगप्रसिद्ध महाविद्यालये आहेत. पुण्याला पूर्वीचे ऑक्सफर्ड असेही म्हणतात. तसेच पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील अनेक देशांतील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. यामुळेच पुणे शहरास विद्येचे माहेरघर असे सुद्धा बोलले जाते.

पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

 • पर्वती
 • लोणावळा – खंडाळा
 • सिंहगड
 • शिवनेरी किल्ला
 • शनिवारवाडा
 • आगाखान पॅलेस

पुणे जिल्ह्यातील नद्या

 • भीमा
 • इंद्रायणी नदी
 • कर्‍हा
 • कुकडी नदी
 • घोड नदी
 • नीरा
 • पवना नदी
 • मांडवी
 • मीना
 • भामा
 • मुठा नदी
 • मुळा नदी

पुणे कुठे आहे? । where is Pune located?

पुणे हे महाराष्ट्रातील महत्वाचे शहर असून हे शहर भारतातील साहवे सर्वात मोठे शहर आहे. पुणे हे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात खूप पुढे आहे. इथे तंत्रज्ञान क्षेत्रातील खूप मोठ मोठ्या कंपन्या आहेत.

पुणे हे शहर मुंबई पासून १५० किलोमीटर इतके आहे. तसेच पुण्यामध्ये विमानतळ आहे त्यामुळे विमानाने सुद्धा पुण्याला जाणे शक्य आहे.

पुणे जिल्ह्याची माहिती आणि इतिहास | Pune District Information in Marathi

Leave a comment