डास मारण्याचे घरगुती उपाय | Home Remedies to Kill Mosquitos

Home Remedies to Kill Mosquitos डास मारण्याचे घरगुती उपाय – नमस्कार स्वागत आहे आपले आपल्या आरोग्य मराठी ब्लॉग मध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत कि डास मारण्यासाठी आपण घरामध्येच कोणते उपाय करू शकतो.

तर आता पावसाळा आला आहे आणि आपल्याला माहित आहे कि पावसाळ्यामध्ये डासांचे प्रमाण सुद्धा जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्याला घरामध्ये डासांचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे.

जर आपण पहिले डेंगू मलेरिया यांसारखे आजार सुद्धा जास्त प्रमाणात डास चावल्यामुळे होत असतात. तर आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत कि आपण घरातील डास कमी करण्यासाठी कोणते उपाय करू शकतो.

डास मारण्याचे घरगुती उपाय Home Remedies to Kill Mosquitos

१. पहिला उपाय हा रामबाण उपाय आहे आणि हा उपाय सर्वानाच माहित आहे तो म्हणजे कडुलिंबाचा धूर घरामध्ये करणे. कडुलिंबाच्या धुराच्या वासामुळे घरातील डास पळून जाण्यास मदत होत असते त्यामुळे याचा फायदा नक्कीच तुम्हला होत असतो.

२. घरातील दारं खिडक्या बंद करून घरामध्ये कपूर जाळावा. कापूरच्या वासाने सुद्धा घरामध्ये डास येण्यास कमी होतात. तसेच अनेक आजारापासून आपला बचाव होऊ शकतो.

३. तुळशीच्या पानाचा रस सुद्धा भरपूर उपयोगी आहे. आपण जर आपल्या हातापायांना तुळशीच्या पानाचा रस लावला तर त्या वासाने सुद्धा आपल्याला डास चावत नाहीत. Home Remedies to Kill Mosquitos

४. कडुलिंबाचा रस एक स्प्रे च्या बाटलीमध्ये भरून तो एका कागदावर मारा. कागद सुकल्यानंतर तुम्ही तो कागद जाळल्याने त्याचा धूर व वास यामुळे डास घरामध्ये येत नाहीत.

५. पुदिन्याच्या वासाने सुद्धा डास दूर पाळतात. रात्री झोपताना पुदिन्याची दोन तीन पाने हातापायावर चोळल्याने सुद्धा डासांपासून तुम्ही बचाव करू शकतात. Home Remedies to Kill Mosquitos

हे पण वाचा –

Leave a comment