Boost Immunity Power – रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे घरघुती उपाय करा

Home remedies to boost immunity power – कोरोना ची दुसरी लाट हि आपल्या देशामध्ये आली असून त्याचा सामना आपल्या देशातील लोक करत आहेत. या काळात सर्वांनी सुरक्षित राहणे खूप महत्वाचे आहे त्यासाठी तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे.

या काळात आपल्याला आपली प्रतिकार शक्ती कशी वाढवता येईल त्याचा विचार केला पाहिजे कारण जा तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर तुम्हला कोरोना होण्याची शक्याता सुद्धा कमी आहे.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे घरघुती उपाय करा

Home remedies to boost immunity power
Home remedies to boost immunity power

१. दररोज सकाळी योग करणे

आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच व्यायाम होय. तुम्ही जर सकाळी उठून योग करण्यास सुरुवात केली तर त्याचा फायदा तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नक्की होते.

योग केल्यामुळे तुमचे शरीर लवचिक होते तसेच तुम्हला असणारे शरीरातील आजार कमी होण्यास योग चा उपयोग होत असतो.

योगा करताना तुम्ही मेडिटेशन केले तर तुम्हला त्याचा फायदा तुम्हला तुमचे मन शांत राहण्यासाठी होत असतो. त्यामुळे तुमचा दिवस सुद्धा छान जातो.

२. हळद घालून दूध पिणे

जसेकी आपल्या सर्वना माहित आहे कि जर आपल्याला थोडी कणकण जर आली तर लगेच आपली आई आपल्याला हळद घातलेलं दूध पिण्यासाठी देत असते.

हळद घातलेलं दूध पिल्याने तुमच्या शरीराला लगेच ऊर्जा देण्यासाठी ज्या पोषक घातकणीची गरज असते ते हळदी मध्ये असतात.

हळद घातलेलं दूध पिल्याने तुम्हला तुमच्या शरीरातील इतर आजार सुद्धा नाहीशे होण्यास मदत होत असते. Boost Immunity Power

३. हिरव्या भाज्यांचे सेवन करा

आपल्या शरीराला लागणाऱ्या सर्व गोष्टींचा समावेश हा हिरव्या पालेभाज्यांमध्ये असतो. हिरव्या पालेभाज्यांमध्ये सर्व प्रकारची जीवनसत्वे तसेच कॅलसिअम चे प्रमाण सुद्धा अधिक असते जे कि आपल्या शरीरासाठी उत्तम असते.

पालेभाज्यांचा समावेश जर आपल्या सेवनामध्ये केला तर त्याचा फायदा आपल्याला निरोगी राहण्यासाठी होतो.

तसेच आपण नेहमी मांसाहार कमी करून शाकाहारी गोष्टींचा समावेश आपल्या आहारामध्ये करायला हवा.

४. कडुलिंबाचा वापर करणे

कडुलिंब हे अतिशय गुणकारी वनस्पती असून तिचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात अनेक आजार बरे कारणासाठी केला जातो.

दररोज कडुलिंबाची काही पाने खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती Boost Immunity Power खूप वाढू शकते. कडुलिंब हे अतिशय गुणकारी झाड असून त्याचा उपयोग हजारो वर्षांपासून आयुर्वेद मध्ये केला जात आहे.

कडुलिंबाचे पाने, साल, फळ तसेच मुळे हे सर्वच भाग हे आजार बरे करण्यासाठी वापरले जातात.

५. फळांचे सेवन करा

दररोज तुमच्या आहारामध्ये किमान एका फळाचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही करत असलेल्या कामामुळे तुम्हला थकवा येऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हला त्वरित energy ची गरज असते. अशातच जर तुम्ही एखादे फळ खाल्ले तर तुम्हला लगेच शरीरामध्ये ऊर्जा आल्यासारखे वाटेल.

विविध प्रकारच्या फळांचा समावेश तुमच्या आहारामध्ये केल्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला उत्तम आरोग्य लाभण्यासाठी होत असतो.

Home remedies to boost immunity power

Leave a comment