Elephant Information in Marathi | हत्ती माहिती निबंध

Elephant information in marathi – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आज आपण पाहणार आहोत अशा प्राण्याची माहिती जो जंगलातील सर्वात मोठा प्राणी असतो. 

तर आज आपण पाहणार आहोत हत्ती या प्राणी विषयी माहिती पाहणार आहोत. हत्तीची माहिती
 
Elephant Information in Marathi
Elephant information in Marathi

Elephant information in marathi हत्तीची माहिती

 
1. हत्ती हा जंगलातील सर्वात मोठा भिमकाय आणि बलाढ्य प्राणी आहे. 
 
२. साधारणपणे हत्तीची उंची ही सव्वातीन ते साडेतीन मीटर पर्यंत असू शकते.
 
३. हत्तीचे शरीर हे अगदी बारीक डोळे, सुपासारखे कान, लांब सोंड तसेच पाठीमागे शेपूट आणि बलाढ्य पाय असे असते.
 
४. इतर जंगली प्राण्यांना पाहता हत्ती हा अधिक बुद्धिमान असतो त्यामुळे हत्तीला शिकवण देऊन त्यांच्याकडून अधिक बलवान कामे करून घेतली जातात.
 
५. जंगलामध्ये हत्ती कळपामध्ये आढळून येतात. साधारणपणे एका कळपात सुमारे २० ते २५ हत्ती आढळून येतात.
 
६. हत्तीच्या शरीराचे वजन जरी मोठे असले तरी शरीराच्या मानाने त्याचा मेंदू हा बारीक असतो.
 
७. त्याचा रंग हा करडा, तपकिरी आणि काळपट असून त्याच्या शरीरावर विरळ केस असतात.
 
८. थायलंड व म्यानमार या देशामध्ये क्वचित पांढरे हत्ती सुध्दा आढळून येतात.
 
९. भारतामध्ये आढळणाऱ्या हत्तीचे वजन हे सुमारे. ३६०० किलो इतके असते.
 
१०. एका प्रौढ हत्तीची सोंड ही सुमारे १.५ मीटर एवढी लांब आसू शकते आणि सोंडे चे वजन हे १४० किलो इतके आसू शकते.
Essay on Elephant in Marathi

Leave a comment