Dal Tadka Recipe in Marathi डाळ तडका मराठी रेसिपी

Dal Tadka Recipe in Marathiखूप लोक कुटुंबासोबत जेवण करण्यासाठी बाहेर हॉटेल मध्ये जाणे पसंत करतात. किंवा प्रवासादरम्यान हॉटेल मध्ये जेवण करणे हि साहजिक गोष्ट आहे. आणि सर्व हॉटेल मध्ये डाळ तडक मिळतोच. परंतु तुम्ही कधी डाळ तडक घरी बनवण्याचा प्रयत्न केला आहे का आज इथे तुम्हला डाळ तडक घरी कसा बनवायचा त्याची कृती सांगण्यात आली आहे.
 
   Dal Tadka Recipe in Marathi
   Dal Tadka Recipe in Marathi

Image Credit – www.vegrecipesofindia.com

डाळ तडका मराठी रेसिपी Dal Tadka Recipe in Marathi

साहित्य:

1/2 वाटी डाळ

1/2 वाटी मुगाची डाळ

1/2 वाटी चण्याची डाळ

बारीक चिरलेला कांदा

बारीक चिरलेला टोमॅटो

बारीक चिरलेली कोंथिबीर

लाल तिखट

जिरे

मोहरी

हिंग

कढीपत्ता पाने

लसूण पाकळ्या

2 सुक्या लाल मिरच्या

मीठ चवीनुसार

कृती :

  1.  सर्वप्रथम कूकरमध्ये सर्व डाळी मऊसर शिजवून घ्याव्या.
  2.  त्यांनतर कढईमध्ये तेल घ्यावे त्यात हिंग, मोहरीची व कढीपत्ता टाकून फोडणी द्यावी. त्यानंतर तेलात कांदा व टोमॅटो घालून परतून घ्यावे व हळद आणि लाल तिखट घालावे. 
  3. मग शिजलेल्या डाळी घोटून त्यात घालाव्यात. कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून 1 उकळी घावी. गरज असेल तर त्यात पाणी घालावे . डाळ तडक नेहमी जाडसर असू द्यावा.
  4. शेवटी फोडणीला कढईत तेल गरम करून आधी जिरे मग मोहरी टाकून नंतर मिरचीचे तुकडे घालावेत आणि डाळीला वरील फोडणी दयावी.
  5. नंतर डाळ सर्व्ह करावी.

People also search Like 

दाल तडका मराठी रेसिपी 

Kolhapuri dal tadka in marathi 
Restaurant style dal fry recipe in marathi

Leave a comment