कस्टम ड्युटी म्हणजे काय? Custom Duty Information in Marathi

Custom Duty Information in Marathi – नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या ब्लॉग वर तर आज आपण पाहणार आहोत कि कस्टम ड्युटी म्हणजे काय असते आणि ते कशासाठी भरावे लागते.

जस कि मित्रांनो कर म्हणजेच Tax सर्वांनाच माहित आहे तर कस्टम ड्युटी Custom Duty सुद्धा एक Tax चा प्रकार आहे ज्यामध्ये तुम्हला परदेशातून वस्तू आयात किंवा निर्यात करण्यासाठी कर टॅक्स भरावा लागतो.

जर तुम्ही एखादे प्रॉडक्ट Product वस्तू बाहेरील देशातून आपल्या देशात मागवत असाल तर तुम्हला त्यासाठी काही प्रमाणात Tax द्यावा लागतो.

आपल्या भारतामध्ये Central Board of Indirect Taxes and Customs म्हणजेच CBIC या संस्थेकडून कस्टम ड्युटी संबंधी धोरणे ठेवली जातात आणि हि संस्था भारताच्या अर्थ खात्याच्या Finance Ministry अंतर्गत काम करत असते.

Custom Duty Information in Marathi
Custom Duty Information in Marathi

कस्टम ड्युटी म्हणजे काय? Custom Duty Information in Marathi

तसे पाहता कस्टम ड्युटी मध्ये दोन प्रकार पडतात.

  • इम्पोर्ट कस्टम ड्युटी – Import Custom Duty
  • एक्स्पोर्ट कस्टम ड्युटी – Export Custom Duty

इम्पोर्ट कस्टम ड्युटी म्हणजे काय?

आता आपण समजून घेऊया कि What is Import Custom Duty? इम्पोर्ट कस्टम ड्युटी म्हणजेच ज्या गोष्टी किंवा तुम्ही परदेशातून आपल्या देशामध्ये Import आयात करत असतात त्यावर जो Tax लावला जातो त्यालाच इम्पोर्ट कस्टम ड्युटी असे म्हणतात.

आपल्या देशामध्ये भरपूर गोष्टी बाहेर इतर देशातून आयात केल्या जातात. आयात केलेल्या प्रत्येक वस्तूवर Central Board of Indirect Taxes and Customs म्हणजेच CBIC ने ठरवलेल्या नियमानुसार त्यावर Import Custom Duty लावली जाते.

प्रत्येक देशामध्ये इम्पोर्ट कस्टम ड्युटी ची रक्कम हि वेगवेगळी असते तसेच Custom Duty किती असते हे तुम्ही जी वस्तू इम्पोर्ट करत आहेत त्यावर अवलंबून असते.

सरकार कडून जो इम्पोर्ट-एक्स्पोर्ट कस्टम ड्युटी लावण्याचा एक महत्वाचा हेतू म्हणजे जो महसूल याकरातून येईल त्याचा उपयोग या आपल्या देशातील इतर व्यापारांमध्ये सुधारणा करण्यासाठी केला जावा.

एक्स्पोर्ट कस्टम ड्युटी म्हणजे काय?

ज्याप्रमाणे आपण इम्पोर्ट कस्टम ड्युटी ची माहिती घेतली तसेच आपण आता What is Export Custom Duty? याची माहिती घेणार आहोत.

एक्स्पोर्ट कस्टम ड्युटी म्हणजेच ज्या वस्तू आपण आपल्या देशातून इतर देशांमध्ये पाठवणार म्हणजेच निर्यात करणार आहोत त्या वस्तूवर सरकारद्वारे जो कर लावला जातो त्यालाच एक्स्पोर्ट कस्टम ड्युटी असे म्हणतात.

भरपूर मोठमोठया कंपन्या त्यांच्या वस्तू व्यापारासाठी दुसऱ्या देशामध्ये पाठवत असतात तर त्या प्रत्येक वस्तूवर काही प्रमाणात Export Custom Duty द्यावी लागते.

प्रत्येक देशामध्ये एक्स्पोर्ट कस्टम ड्युटी हि तेथील सरकाने ठरवलेल्या नियमाप्रमाणे असते. Custom Duty Information in Marathi

हे पण वाचा

दरडोई उत्पन्न म्हणजे काय? | What is per capita Income in Marathi

Leave a comment