Corona Virus Information in Marathi (कोरोना आजाराची लक्षणे आणि उपाययोजना)

Corona Virus Information in Marathi
Corona Virus Information in Marathi


Corona Virus Information in Marathi – कोरोना म्हटलं कि काही दिवसांपासून लगेच भीतीच वातावरण तयार होत. जसेकी जगामध्ये साध्यस्तीतीला एकही व्यक्ती नसेल ज्याला कोरोना या आजाराविषयी माहिती नसेल.


जरी लोकांना कोरोना या आजाराची लक्षणे आणि उपाययोजना माहित नसल्या तरी लोकांना कोरोना हा आजार खूप जीवघेणा आहे आसा समाज झाला आहे.

खरंच कोरोना एवढा जीवघेणा आजार आहे का ? का फक्त Social Media मुळे पसरणाऱ्या खोट्या बातम्या मुळे लोकांना हा आजार जीवघेणा वाटत आहे?

Corona Virus Information in Marathi 

तर या पोस्ट मध्ये आपण कोरोना या आजाराविषयी पूर्णपणे माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोरोना विषाणू काय आहे? या कोरोना आजाराची सुरुवात कोठून झाली? या कोरोना आजाराची प्राथमिक लक्षणे काय असतात? उपाययोजना काय असतात? तसेच तुम्ही कोणती काळजी घेण्याची गरज आहे? तरी तुम्ही हि पोस्ट पूर्णपणे वाचावी आणि हवी ती काळजी घ्यावी हि आमच्या आरोग्यमराठी कडून तुम्हला विनंती.

कोरोना व्हायरस किंवा आजार काय आहे ?

तसे पाहता कोरोना हा आजार एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जाणार आजार आहे म्हणजेच हा आजार संसर्गजन्य आजार आहे.

नॉटिंगम युनिवर्सिटी मधील वायरोलॉजीचे या विषयाचे प्राध्यापक असलेले जोनाथ बॉल याच्या मते हा आजार प्राण्यांपासून माणसांमध्ये आल्याची दाट शक्यता आहे.

या कोरोना आजारामुळे पूर्ण जगामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जगामध्ये असा कोणताही देश उरलेला नाही जिथे या कोरोना आजाराने धुमाकूळ घातला नाही.
 
तसेच मागच्या काही दिवसापासून भारतामध्ये सुद्धा या आजाराचे रुग्ण दिसू लागले आहेत त्यामुळे आपल्या भारत सरकारनं याविषयी लवकरच उपाय योजना करायला सुरुवात केली आहे.
 
सरकारने कोरोना पासून लोकांचा बचाव करण्यासाठी लोकांना घरामधून कमी बाहेर पडण्यास सांगितले आहे. तसेच देशातील बहुतेक कंपनीकडून आपल्या कामगारांना सुट्टी जाहीर केली आहे किंवा त्यांना आपले काम घरातूनच करण्याचे आदेश दिले आहेत.
 
खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने सर्व शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर केली आहे. पुढच्या ३१ मार्च पर्यंत भारतातील सर्व शाळा कॉलेज बंद राहतील असे आदेश सरकार कडून देण्यात आले आहेत. Corona Virus Information in Marathi 

कोरोना  आजाराची सुरुवात कोठून झाली?

कोरोना आजाराची सुरुवात हि चीन या देशातील वुहान या शहरातून झाला आहे. या शहरापासून या विषाणूची सुरुवात झाली म्हणून या आजाराला वुहान व्हायरस असे सुद्धा म्हटले जाते.
 
जगात  सर्वात जास्त लोक कोरोना बाधित याच चीन देशात झाले आहेत. आणि चीनमध्ये सुद्धा सर्वात जास्त या वुहान या शहरात झाले आहेत.
 
त्यानंतर हळूहळू या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव हा इतर देशांमध्ये सुद्धा दिसू लागला. आता तर असे झाले आहे कि जगातील असा कोणताही देश उरलेला नाही जिथे या कोरोना या आजाराने धुमाकूळ घातला नाही.
 
जवळपास जगामध्ये १४० पेंक्षाहून अधिक देशांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यांचा आकडा हा लाख मध्ये आहे.

जगामध्ये १४० देशामध्ये (१७००००) एक लाख सत्तर हजाहून अधिक रुग्ण आढळून आली आहेत. या रुग्णामध्ये बहुतेक रुग्ण हे योग्य उपचार घेऊन बरे सुद्धा झाले आहेत. त्यामुळे कसल्याही प्रकारे लोकांना घाबरण्याचे कारण नाही.

कोरोनाची लक्षणे कोणती असतात?

कोरोना या आजाराची लक्षणे ओळखणे खूप सोपं असत. जर खालील प्रकारे तुम्हला कोणत्याही प्रकारचा त्रास आढळून येत असेल तर तुम्हाला लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये जाऊन आजाराचे निदान करणे गरजेचे आहे.
 1. खोकला
 2. घसा खवखवणे
 3. ताप
 4. निमोनिया, फुफ्फुसात सूज
 5. डोकेदुखी
 6. नाक गळणे
 7. अस्वस्थ वाटणे
 8. शिंका येणे, धाप लागणे
 9. थकवा जाणवणे


वरील पैकी कोणताही त्रास तुम्हला होत असेल तर याचा अर्थ असा होत नाही कि तुम्हला कोरोना असू शकतो त्यामुळे तुम्हला आधी घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते तुम्हला योग्य ते उपाय सांगतील.

कोरोना आजार किंवा विषाणू किती गंभीर आहे?

साधारणपने कोरोना आजारांमध्ये खोकला, घास दुखणे, ताप येणे, डोकेदुखी आणि नाक गळणे असे लक्षणे दिसून येत.

जर तुम्हला असे लक्षणे दिसून येत असतील तर तुम्हला लवकरात लवकर डॉक्टर कडे जाऊन यावर योग्य ती ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे.

तुम्ही आळस न करता हॉस्पिटल मध्ये जाऊन योग्य ते उपाय करणे गरजेचे आहे अन्यथा या अजमध्ये मृत्यू सुद्धा ओढवू शकतो.


 

कोरोना विषाणू चा फैलाव कसा होतो?

कोरोना विषाणू चा हा संसर्गजन्य आजार असून त्याचा फैलाव हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो.
 
जसे कि जर एका व्यक्तीच्या संपर्कात दुसरी व्यक्ती आली तर त्या दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा कोरोना होण्याची दाट शक्यता असते.
 
खोकल्यातून बाहेर पडणारे तुषार जर तुमच्या हाताला लागले आणि जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीशी हात मिळवला तर हा आजार दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा होऊ शकतो.
 
या कारणामुळे सरकारने जमावाच्या ठिकाणी फिरणे धोक्याचं आहे असे सांगितले आहे.
 
शाळा, कॉलेजेस तसेच ऑफिस या ठिकाणी जमाव जास्त असतो त्यामुळे सरकारने सर्व शाळा कॉलेजेस बंद करण्याचे आदेश दिले आहेत. Corona Virus Information in Marathi 

 

 

कोरोना विषाणूंचा फैलाव वेगाने होत आहे का?

कोरोना या विषाणूची सुरुवात हि चीन या देशातील वुहान या प्रांतातून झाली हाती. वुहान हे शहर खूप लोक वस्ती असणारे शहर आहे. करोडो लोक या शहरात राहतात त्यामुळे या रोगाचा फैलाव हा खूप वेगाने या शहरामध्ये झाला आहे.

जगामध्ये सर्वात जास्त कोरोना बाधित लोक हे याच वुहान या शहरात आढळून आले आहेत. तसेच चीन मधील इतर शहरातील लोक सुद्धा कोरोना बाधित आहेत.

आता पूर्ण जगामध्ये १४० पेक्षा अधिक देशामध्ये कोरोना बाधिक लोक आढळून आले आहेत. त्यामुळे भारतामध्ये खूप लोकसंख्या असल्यामुळे लोकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारकडून कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत?

चीन मधील भीषण परिस्तिथी पाहून भारत सरकाने लवकरच आपल्या देशामध्ये तातडीने पाऊल उचले आहे. खालील प्रमाणे सरकार उपाययोजना करत आहे.
 1. खबरदारी म्हणून सरकारने सर्व शाळा कॉलेजेस बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
 2. परदेशातून येणारे प्रवाश्यांचे तपासणी करूनच त्यांना घरी सोडण्यात येत आहे.
 3. सरकारकडून धार्मिक स्थळे बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 4. सरकार कडून आवाहन करण्यात येत आहे कि पुढील १५ दिवस घराबाहेर पडणे टाळावे.
 

कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा?

 1.  खोकला किंवा शिंक आल्यास नेहमी तोंडाला रुमाल किंवा टिशू धरावा.
 2. वापरलेल्या टिशू ला कचऱ्याच्या डब्ब्यात टाकावे.
 3. तुमच्या डोळ्याला आणि तोंडाला परत परत हात लावू नये.
 4. तुमचे हात स्वच्छ साबणाने २० सेकंद पर्यत धुवावे.
 5. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
 6. जर तुम्हला खोकला, ताप आणि सर्दी या सारखे लक्षणे आढळून आले तर त्वरित डॉक्टरांकडे जावे.
 7. नेहमी तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा.
Corona Virus Information in Marathi 
कोरोना विषयी अधिक माहितीसाठी स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकारच्या ०११ २३९७८०४६ or १०७५ या हेल्पलाईन नंबर वर संपर्क करावा.

Leave a comment